महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती maharashtra floods निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरे, शेतजमिनी, जनावरे, शेतीमाल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून समाजात एकजुटीचा संदेश दिला आहे.
शिक्षण विभागाचा पुढाकार : Maharashtra floods
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मदतकार्यात पुढाकार घेत आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासोबतच शिक्षण राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त यांनी देखील आपल्या एका महिन्याचा पगार देऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागाने दाखवलेली संवेदनशीलता आणि जबाबदारी अधोरेखित होते.
शिक्षक व शिक्षक संघटनांचा पुढाकार
शिक्षक वर्ग हा समाजाचा मार्गदर्शक मानला जातो. संकटाच्या काळात हा वर्ग नेहमीच समाजासाठी उभा राहिला आहे. यावेळी देखील राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी जाहीर केले आहे की, शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या (Maharashtra floods )मदतीसाठी जमा करणार आहेत. लाखो शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार असल्यामुळे मदतीची ही रक्कम मोठ्या प्रमाणात उभी राहणार आहे.
समाजासाठी शिक्षण विभागाचे प्रेरणादायी पाऊल
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना स्पष्ट केले की, “राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक संघटना आणि शिक्षक यांनी दाखवलेले योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटाच्या काळात आपण सर्वजण एकत्र आलो तर कोणतेही संकट मोठे राहत नाही.”
खरं तर, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी मदतीसाठी दाखवलेली तयारी ही फक्त आर्थिक मदत नसून एक नैतिक आधार देखील आहे. पूरग्रस्तांना या मदतीतून दिलासा मिळणार असून त्यांच्या आयुष्याला नव्याने दिशा देण्यास मदत होईल.
शालेय शिक्षण विभागाचा सामाजिक दृष्टिकोन
शालेय शिक्षण विभाग हा फक्त शाळा, अभ्यासक्रम, परीक्षा इतकाच मर्यादित नाही, तर समाजाशी जोडलेला आहे. समाजातील प्रत्येक घटक संकटात असताना शिक्षण विभाग त्यांच्यासोबत उभा राहतो, याचा प्रत्यय या निर्णयातून पुन्हा एकदा आला आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शिक्षक व शाळांनी आपले योगदान दिलेले आहे.
पूरग्रस्तांना ( Maharashtra floods ) मिळणारी ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून त्यांना मिळणारा मानसिक दिलासा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. शिक्षण विभागाने उचललेले हे पाऊल समाजातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.