india cough syrup : कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू — देशभरात खळबळ, केंद्र सरकारने दिल्या कडक सूचना

भारतामध्ये पुन्हा एकदा कफ सिरपमुळे ( india cough syrup ) झालेल्या मुलांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये मागील काही दिवसांत किमान १२ मुलांचे मृत्यू झाले असून, त्याचा संबंध “Coldrif” या कफ सिरपशी जोडला जात आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे आणि सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

नेमक काय घडल ?

सुरुवातीला मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात काही मुलांचा अचानक मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले. तपासात समजले की या मुलांना साध्या सर्दी-खोकल्यासाठी “Coldrif” नावाचे सिरप cough syrup दिले गेले होते.

या सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यामध्ये Diethylene Glycol (DEG) आणि Ethylene Glycol या अत्यंत विषारी रसायनांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले.

ही रसायने औद्योगिक वापरासाठी असतात, परंतु औषध तयार करताना ती चुकून वापरल्यास ती शरीरात जाऊन किडनी, लिव्हर व नर्व्हस सिस्टीमचे गंभीर नुकसान करू शकतात. पूर्वीही अशाच रसायनांमुळे गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये भारतीय औषधांमुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले होते.

कफ सिरपवर ( cough syrup ) बंदी आणि कारवाई

राज्य प्रशासनाने तात्काळ या सिरपची ( indian cough syrup ) विक्री बंद केली असून ४३३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.त्यापैकी २२२ बाटल्या आधीच बाजारात विकल्या गेल्याची माहिती आहे. त्यामुळे तपास अधिक व्यापक पातळीवर नेण्यात आला आहे. या प्रकरणात सिरप तयार करणाऱ्या Rico Remedies Pvt. Ltd. या औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच सिरप prescribe करणाऱ्या एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने ज्या सर्व जिल्ह्यांत हे औषध वितरित झाले आहे, तिथे स्थानिक औषध निरीक्षकांना छापे मारण्याचे आदेश दिले आहेत.

पालकांनी काय दिली माहिती

मृत मुलांच्या पालकांनी स्थानिक प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर उशिरा प्रतिसाद दिल्याचा आरोप केला आहे. काही पालकांनी आणि दिलेल्या निवेदनात सांगितले की —

“मुलांना खोकला आणि ताप झाल्यानंतर डॉक्टरांनी हे सिरप दिले. काही दिवसांनी ते बेशुद्ध झाले आणि मूत्रपिंड निकामी झाले.”

काही ठिकाणी मृत मुलांचे पोस्टमॉर्टम न होणे आणि अधिकृत अहवाल लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे स्थानिक लोकसंख्येत प्रचंड संताप पसरला आहे.

India cough syrup
India cough syrup

 

कफ सिरप ( cough syrup ) बाबत सरकारनी उचलले तात्काळ पावले

केंद्र सरकारने यावर तातडीने प्रतिक्रिया देत सर्व राज्यांना सूचना जारी केल्या आहेत की,

२ वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ किंवा शीतलता सिरप देऊ नयेत.

तसेच, १९ औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Drug Controller General of India (DCGI) यांनी देशभरातील प्रयोगशाळांना नमुने पाठवून रासायनिक विश्लेषण सुरू केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “ज्या कंपन्यांनी औषध तयार करताना WHO च्या गुणवत्ता मानकांचे उल्लंघन केले असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”

पूर्वीही भारतात घडलेली आहेत अशीच प्रकरणे

भारतामध्ये ही अशी पहिली वेळ नाही. 2022 मध्ये गाम्बियामध्ये भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपमुळे 70 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये उझबेकिस्तानमध्येही अशाच घटनेत 19 बालकांचा बळी गेला होता. WHO ने त्यावेळी भारतातील औषध गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्व घटनांनंतरही देशात अशा प्रकारचे औषध बाजारात येणे म्हणजे नियामक व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या फफ सिरप ( Indian cough syrup ) बाबत तज्ञांची मते

औषध तज्ज्ञांच्या मते, Diethylene Glycol हे रसायन अत्यंत स्वस्त असल्यामुळे काही लहान उत्पादक ते ग्लिसरीनच्या पर्याय म्हणून वापरतात. पण त्याचा अगदी थोडा प्रमाणही शरीरासाठी विषारी ठरतो. या घटनेनंतर फार्मास्युटिकल उद्योगातील “raw material verification” प्रणाली अधिक कठोर करण्याची मागणी होत आहे.

“कफ सिरप मृत्यू” ( India cough syrup ) प्रकरण हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून, देशातील औषध उत्पादन आणि नियमन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभा करते. कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू ही अत्यंत चिंताजनक घटना आहे. पालकांनी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना देऊ नये. औषध खरेदी करताना त्याची कंपनी, उत्पादन तारीख आणि बॅच नंबर नीट तपासावा. संशयास्पद औषध आढळल्यास तत्काळ FDA किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचे लक्षण दिसल्यास  तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व संपूर्ण माहिती घेऊन  सुरक्षित औषधायाच  वापर करावा आणि अशा घटना वारवार होऊ  नये म्हणून जनजागृती करणे अतिशय महत्वाचे आहे.

केंद्र सरकारनेही अशा औषध कंपन्यांवर “zero tolerance” धोरण राबवावे, अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडतील. यासाठी कडक नियम बनवण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment