MAHA TET अंतरिम निकाल 2026 जाहीर : उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHA TET 2026 चा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची अधिकृत माहिती दिली. ही परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक भरतीसाठी TET परीक्षा अनिवार्य झाल्याने उमेदवारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
निकाल आता उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. परीक्षा परिषदेतर्फे उमेदवारांना या अंतरिम निकालावर आक्षेप नोंदवण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी फक्त त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
MAHA TET ही महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. पेपर 1 हा 1ली ते 5वी शिक्षकांसाठी तर पेपर 2 हा 6वी ते 8वी शिक्षकांसाठी घेतला जातो.
या वर्षीची परीक्षा पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने घेण्यात आली. 19 डिसेंबर रोजी अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांकडून प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि उत्तरांवरील आक्षेप 27 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आले होते. त्या आक्षेपांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन 13 जानेवारी रोजी अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
निकालाबाबत उमेदवारांना सविस्तर माहिती देताना परीक्षा परिषदेनं सांगितले की, निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे. निकाल डाउनलोड करून तपासावा आणि आवश्यक असल्यास त्यावर आक्षेप नोंदवावा.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यंदा MAHA TET परीक्षेसाठी 4 लाख 75 हजार 669 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 3 हजार 334 उमेदवारांनी पेपर 1 साठी तर 2 लाख 72 हजार 335 उमेदवारांनी पेपर 2 साठी नोंदणी केली आहे. हा आकडा राज्यातील शिक्षक भरती परीक्षांच्या इतिहासातील विक्रमी आकडा मानला जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 2013 पासून MAHA TET परीक्षा घेत आहे. आतापर्यंत एकूण आठ वेळा ही परीक्षा घेण्यात आली आहे. या कालावधीत 29 लाख 74 हजार 600 उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 1 लाख 6 हजार 663 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे MAHA TET मधील पात्रतेचे सरासरी प्रमाण 3.5 टक्के आहे.
आतापर्यंत सर्वाधिक निकाल 2018 मध्ये 5.13 टक्के लागला होता. त्याआधी 2013 मध्ये 5.02 टक्के निकाल लागला होता. उर्वरित सर्व वर्षांमध्ये MAHA TET निकाल 2.3 टक्के ते 3.7 टक्के दरम्यान राहिला आहे. यावरून MAHA TET परीक्षा ही अत्यंत कठीण असल्याचे स्पष्ट होते.
2018 आणि 2019 मधील MAHA TET परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आले होते. त्या परीक्षांमध्ये सहभागी असलेल्या 9 हजार 537 उमेदवारांची पात्रता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेनं यंदा अधिक कडक नियमावली लागू केली.
निकाल जाहीर झाल्यानंतर MAHA TET पास झालेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येते. पवित्र पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शिक्षक भरती पोर्टल आहे. TET पात्र उमेदवारांनाच या पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो.
MAHA TET पास झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षक होण्याची मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद व महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते.
निकाल पहा : http://mahatet.in
निकालात अपयशी झालेल्या उमेदवारांनी निराश न होता पुढील वर्षासाठी तयारी सुरू ठेवावी. बालमानसशास्त्र, गणित, पर्यावरण अभ्यास आणि भाषा विषयांवर विशेष लक्ष द्यावे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि नियमित सराव करावा.
MAHA TET परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाची योग्य रणनीती आवश्यक असते. वेळेचे नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव हे यशाचे मुख्य घटक आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन निकाल तपासावा. कोणतीही त्रुटी आढळल्यास 21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवावा. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांना TET प्रमाणपत्र दिले जाईल.
MAHA TET प्रमाणपत्र आजीवन वैध असते. त्यामुळे एकदा परीक्षा पास झाल्यावर उमेदवारांना पुन्हा TET देण्याची आवश्यकता नसते.
शिक्षक भरती प्रक्रियेत MAHA TET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ही परीक्षा प्रत्येक शिक्षक इच्छुकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया शक्यता आहे.