नागपूरमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत शिक्षक संघटनांची बैठक : TET व अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा
नागपूर बैठक : TET व अन्य मागण्यावर चर्चा
नागपूर येथे मा. डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या बैठकीत TET परीक्षा व शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
संघटनांच्या सर्व मुद्द्यांचा स्वीकार करताना राज्य शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले.
18 ऑक्टोबरपर्यंतचा अवधी शासनाला
या सभेत सर्व संघटनांनी एकमताने ठरवले की शासनाने पुढील हालचालींसाठी 18 ऑक्टोबरपर्यंतचा अवधी घ्यावा.
जर या कालावधीत ठोस निर्णय झाला नाही तर 8 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा आंदोलन करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले.
मोर्चा बाबत निर्णय
राज्यातील पूरपरिस्थिती व झालेले नुकसान लक्षात घेऊन 4 ऑक्टोबरचा मोर्चा पुढे ढकलण्यात आला.
मंत्री महोदयांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीत 15 मार्च संचमान्यता शासन निर्णयातील दुरुस्ती करण्याबाबत शासनाने सहमती दर्शवली.
तसेच शिक्षण सेवक, अनुकंपा, BLO व इतर प्रलंबित विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले.
सकारात्मक संवादाची दिशा
एकंदरीत पाहता आजची बैठक यशस्वी आणि सकारात्मक संवादाची ठरली आहे. शिक्षकांच्या विविध मागण्या शासन दरबारी ऐकल्या गेल्या असून येत्या काही दिवसांत याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.