Tet टिईटी परिक्षा बंधनकारक आहे का ?

टिईटी (TET) परीक्षा पास करणे बंधनकारक आहे का ?

     राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद( NCTE ) ने २०१० मध्ये इ. १ ली ते ८ वी च्या शिक्षकानच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ठरवली व टिईटी परिक्षाची tet सुरु केली.

       शिक्षक पदावर नियुक्त झालेल्यांना टिईट tet उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत दिली होती त्यानंतर आणखीन चार वर्ष मुदतवाढवून देण्यात आली होती.

मद्रास हायकोर्टचा निर्णय

     मद्रास हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हटले होते की, 29 जुलै 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी टिईटी tet परिक्षा पास होणे बंधनकारक नाही. परंतु पदोन्नती करायची असेल तर टीईटी tet परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

       पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना टिईटी tet  उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण न केल्यास सराजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल. तथापी सेवेत पाच वर्ष शिल्लक असलेल्या शिक्षकांना खंडपीठाने दिलासा दिला आहे.

अल्पसंख्यांक संस्थेबाबत

    आता हा निर्णय अल्पसंख्यांक संस्थांना लागू होईल की नाही हे मोठ्या खंडपीठात ठरवले जाईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

 

Leave a Comment