.NTA तर्फे UGC NET December 2025 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता, शुल्क, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.
देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी UGC NET परीक्षा ही सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी संधी दिली जाते.
राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) दरवर्षी दोन वेळा — जून आणि डिसेंबर — ही परीक्षा आयोजित करते. आता UGC NET डिसेंबर 2025 साठी अधिसूचना जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर मग पाहूया या अधिसूचनेतील सर्व महत्वाची माहिती, तारखा, पात्रता, परीक्षा पद्धत, शुल्क, आणि तयारीसाठी टिप्स.
महत्वाच्या तारखा ugc net December 20025 (Important Dates)
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अधिसूचना प्रसिद्ध | 7 ऑक्टोबर 2025 |
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 8 ऑक्टोबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 7 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:50 पर्यंत) |
| अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 8 नोव्हेंबर 2025 |
| अर्जातील सुधारणा कालावधी | 10 ते 12 नोव्हेंबर 2025 |
| प्रवेशपत्र (Admit Card) | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ( संभाव्य ) |
| परीक्षा दिनांक |
10 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 ( संभाव्य तारीख) |
| निकाल जाहीर होण्याची अपेक्षित तारीख | जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात (संभाव्य) |
अर्ज शुल्क ugc net December 2025 (Application Fee)
| प्रवर्ग | शुल्क (₹ रुपये) |
|---|---|
| सामान्य (General) | ₹1150/- |
| OBC (Non Creamy Layer) | ₹600/- |
| SC / ST / PwD / तृतीयपंथी | ₹325/- |
अर्ज शुल्क फक्त ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. Debit/Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे पेमेंट करता येईल.
UGC NET परीक्षा म्हणजे काय?
UGC NET (University Grants Commission – National Eligibility Test) ही परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून पात्रता सिद्ध करण्यासाठी घेतली जाते. याचबरोबर JRF (Junior Research Fellowship) मिळविणाऱ्या उमेदवारांना संशोधनासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते आणि देशातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रातील एक सुवर्णसंधी मानली जाते.
पात्रता (Eligibility Criteria)
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी (Post Graduation) 55% गुणांसह पूर्ण केलेली असावी.
- SC/ST/OBC (Non-Creamy Layer)/PwD उमेदवारांना 50% गुणांची सूट आहे.
- अंतिम वर्षातील विद्यार्थी (जे आपली पदवी पूर्ण करत आहेत) ते सुद्धा अर्ज करू शकतात.
- JRF साठी वयोमर्यादा: 30 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
- Assistant Professor साठी वयोमर्यादा नाही.
परीक्षा पद्धत UGC NET (Exam Pattern)
UGC NET परीक्षा Computer Based Test (CBT) स्वरूपात घेतली जाते. एकाच सत्रात दोन्ही पेपर सोडवावे लागतात.
| पेपर | विषय | प्रश्नसंख्या | गुण | कालावधी |
|---|---|---|---|---|
| पेपर 1 | अध्यापन व संशोधन योग्यता, तर्कशास्त्र, सामान्य ज्ञान, ICT इ. | 50 | 100 | 3 तास |
| पेपर 2 | विषयानुसार प्रश्न (उदा. मराठी, इंग्रजी, इतिहास इ.) | 100 | 200 | 3 तास (एकत्रित वेळ) |
- प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात.
- नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही.
दोन्ही पेपर एकत्रितपणे एकाच संगणक सत्रात घेतले जातात.
हे ही वाचा : Tet – शिक्षकांसाठी काय बदल होणार ?
UGC NET परीक्षा विषय (Subjects List)
UGC NET परीक्षा एकूण 83 विषयांमध्ये घेतली जाते. काही प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत:
मराठी, हिंदी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मनोविज्ञान, राजकारणशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वाणिज्य, भूगोल, संगीत, तत्वज्ञान, ग्रंथालय विज्ञान इत्यादी.
उमेदवारांनी आपली स्नातकोत्तर पदवी ज्या विषयात घेतली आहे, त्याच विषयाची निवड करावी.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://ugcnet.nta.ac.in
- “UGC NET December 2025 Registration” लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करा व सर्व वैयक्तिक माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती आणि विषय निवडा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही, प्रमाणपत्रे).
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढा आणि जतन करा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (PG मार्कशीट, Degree)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- वैध ईमेल आणि मोबाईल नंबर
UGC NET उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारे लाभ
- असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता: देशातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी संधी.
- JRF पात्र उमेदवारांना: संशोधनासाठी UGC कडून मासिक शिष्यवृत्ती.
- Ph.D. प्रवेशासाठी प्राधान्य: NET पात्र उमेदवारांना संशोधन क्षेत्रात प्राधान्य मिळते.
- सरकारी नोकरीची संधी: अनेक शिक्षण विभागातील भरतींमध्ये NET पात्रता आवश्यक असते.
- विदेशी संशोधनात संधी: UGC NET पास उमेदवारांना परदेशात संशोधन कार्यक्रमांसाठी मान्यता मिळते.
UGC NET साठी तयारी कशी करावी? (Preparation Tips)
- परीक्षा पद्धतीची नीट समजून घ्या: मागील वर्षांचे पेपर अभ्यासा.
- UGC NET Syllabus डाउनलोड करा: विषयवार तयारीसाठी NTA च्या वेबसाईटवरील अधिकृत सिलेबस वापरा.
- दररोज अभ्यासाचे नियोजन करा: Paper 1 आणि Paper 2 साठी वेगवेगळे वेळापत्रक तयार करा
- Previous year question Paper मागील झालेल्या दोन – तीन वर्षा पुर्वीच्या प्रश्न पत्रिका पाहणे व सराव करणे.