Pavitra portal Shikshak Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या Pavitra portal shikshak bharati 2026 मध्ये एकूण 30,209 शिक्षक पदे उपलब्ध आहेत.
TAIT 2025 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची असून, उमेदवारांना उपलब्ध पदांसाठी पदनिहाय पसंतीक्रम अर्थात प्राधान्यक्रम ऑनलाइन नोंदवून लॉक करणे आवश्यक आहे. पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया 06 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून, अंतिम मुदतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना 16 ऑगस्ट 2026 पर्यंत पसंतीक्रम नोंदवून लॉक करता येणार आहे.
Maharashtra Teacher Vacancy 2026 – (pavitra portal shikshak bharati 2026) एकूण पदांची माहिती
| पद क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | शिक्षण सेवक / शिक्षक | 30,209 |
महाराष्ट्रातील विविध व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये या पदांची भरती करण्यात येणार आहे.
इयत्ता निहाय शिक्षक रिक्त पदांचा तपशील ( pavitra portal shikshak bharati 2026)
उपलब्ध माहितीनुसार इयत्तानिहाय रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
| अ. क्र. | पद प्रकार | रिक्त पदे |
|---|---|---|
| 1 | इयत्ता 1 ली ते 5 वी | 14,320 |
| 2 | इयत्ता 6 वी ते 8 वी | 10,012 |
| 3 | इयत्ता 9 वी ते 10 वी | 5,513 |
| 4 | इयत्ता 11 वी ते 12 वी | 364 |
| एकूण | 30,209 |
यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदांचा समावेश आहे.
व्यवस्थापननिहाय रिक्त पदांचा तपशील ( pavitra portal shikshak bharati 2026)
शिक्षक भरतीतील 30,209 पदे विविध व्यवस्थापनांमध्ये विभागण्यात आली आहेत.
| अ. क्र. |
|
मुलाखतीशिवाय | मुलाखतीसह | एकूण |
|---|---|---|---|---|
| 1 | जिल्हा परिषद | 13,351 | — | 13,351 |
| 2 | नगरपालिका / परिषद | 280 | — | 280 |
| 3 | महानगरपालिका | 1,954 | — | 1,954 |
| 4 | आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा | 2,421 | — | 2,421 |
| 5 | शासकीय विद्यानिकेतन | 56 | — | 56 |
| 6 | खाजगी शैक्षणिक संस्था | 1,819 | 10,328 | 12,148 |
| एकूण | 19,881 | 10,328 | 30,209 |
यापैकी 19,881 पदे मुलाखतीशिवाय, तर 10,328 पदे मुलाखतीसह भरली जाणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे
Pavitra portal Shikshak Bharti 2026 पात्रता
शिक्षक पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उपलब्ध माहितीनुसार प्राथमिक स्वरूपात पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
इयत्ता 1 ली ते 5 वी
- D.Ed. / D.El.Ed. — शासनाच्या नियमानुसार
- TAIT 2025 उत्तीर्ण
- TET/ CTET उत्तीर्ण
इयत्ता 6 वी ते 8 वी
- B.Ed. — शासन नियमानुसार
- TAIT 2025 उत्तीर्ण
- TET/ CTET उत्तीर्ण
इयत्ता 9 वी ते 10 वी
- संबंधित विषयातील पदवी
- B.Ed.
- TAIT 2025 उत्तीर्ण
- TET / CTET उत्तीर्ण
इयत्ता 11 वी ते 12 वी
- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
- B.Ed.
- TAIT 2025 उत्तीर्ण
महत्त्वाची सूचना: वरील पात्रता ही उपलब्ध माहितीनुसार दिली आहे. प्रत्यक्ष अर्ज किंवा पदाची निवड करण्यापूर्वी संबंधित पदासाठी पवित्र पोर्टलवरील ( pavitra poratal) अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
Maharashtra Pavitra portal Shikshak Bharti 2026 साठी उपलब्ध माहितीनुसार उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार 5 वर्षांची वयाची सवलत लागू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : https://mahaknowledge.in/शिक्षण-सेवक-teachers-salary/
पसंतीक्रम म्हणजे काय?
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी उपलब्ध असलेल्या पदांपैकी उमेदवाराला आपल्या पात्रतेनुसार पदे आणि शाळांची निवड करून त्यांना प्राधान्यक्रम द्यावा लागतो. यालाच पसंतीक्रम / प्राधान्यक्रम नोंदणी असे म्हणतात.
उमेदवारांनी पसंतीक्रम भरताना विशेष काळजी घ्यावी. कारण चुकीचा प्राधान्यक्रम निवडल्यास त्याचा परिणाम पुढील निवड प्रक्रियेवर होऊ शकतो.
पसंतीक्रम भरताना या गोष्टी तपासा
pavitra portal shikshak bharati 2026
Important Dates
| प्रक्रिया | तारीख |
|---|---|
| पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात | 06 ऑगस्ट 2026 |
| मूळ अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2026 |
| मुदतवाढीनंतर अंतिम तारीख | 16 ऑगस्ट 2026 |
म्हणजेच, उमेदवारांनी आता 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत लक्षात ठेवून आपला पसंतीक्रम नोंदवून लॉक करावा.
Official वेबसाईड : https://mahateacherrecruitment.org.in/
उमेदवारांनी काय करावे?
पवित्र पोर्टलवर लॉगिन करून उपलब्ध शिक्षक पदांच्या जाहिराती पाहाव्यात. आपल्या पात्रतेनुसार योग्य पदे निवडून त्यांचा पसंतीक्रम तयार करावा. पसंतीक्रम अंतिम करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. त्यानंतर पसंतीक्रम Lock करणे आवश्यक आहे.
शेवटच्या दिवशी वेबसाइटवर तांत्रिक अडचण किंवा सर्व्हरवरील जास्त भार येण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी शक्यतो अंतिम दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करावी.
30,209 पदांमुळे शिक्षक होण्याची मोठी संधी
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 30,209 पदांची भरती ही मोठी संधी आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पदे उपलब्ध आहेत.
विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये 13,351 पदे असल्याने इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.