राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT Exam 2026) च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी सूचना दिल्या आहेत.
यंदा संकलित मूल्यमापन चाचणी १ अर्थात पॅट परीक्षा नेहमीच्या वेळेपेक्षा उशिराने होणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच संकलित मूल्यमापन चाचणी २ एप्रिल २०२७ मध्ये घेण्यात येणार आहे.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या सत्राच्या अखेरीस संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि दुसऱ्या सत्राच्या अखेरीस संकलित मूल्यमापन चाचणी २ घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या चाचण्यांचे आयोजन केले जाते.
PAT Exam 2026 कधी होणार ?
SCERT पुणे यांच्या सूचनेनुसार संकलित मूल्यमापन चाचणी १ नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
| परीक्षा | कालावधी |
|---|---|
| संकलित मूल्यमापन चाचणी १ | नोव्हेंबर २०२६चा शेवटचा आठवडा |
| संकलित मूल्यमापन चाचणी २ | एप्रिल २०२७ |
कोणत्या विषयांसाठी परीक्षाची Pat परीक्षा ?
संकलित मूल्यमापन चाचणी १ एकूण दहा माध्यमांत घेण्यात येणार आहे. यासाठी प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या SCERT पुणे यांच्याकडून शाळांना विद्यार्थिनिहाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शाळेच्या वेळापत्रकानुसार परीक्षा सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात घेता येणार आहे.
लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा
या चाचणीमध्ये लेखी परीक्षेबरोबरच तोंडी परीक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर संबंधित विषयाची तोंडी परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच या चाचणी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
पायाभूत चाचणीबाबतही संभ्रम
यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर SCERTकडून आयोजित करण्यात येणारी पायाभूत चाचणीही झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या सत्राच्या अखेरीस घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी १ बाबत शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
आता SCERTकडून देण्यात आलेल्या सूचनांमुळे पॅट परीक्षेच्या आयोजनाबाबतची स्थिती स्पष्ट झाली आहे.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगतीचे मूल्यमापन करण्यास तसेच ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये अडचणी आहेत, त्यांच्यासाठी पुढील कृती कार्यक्रम तयार करण्यास या चाचणीचा उपयोग होणार आहे.
शाळांनी SCERTकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार आणि शालेय वेळापत्रकानुसार परीक्षेचे नियोजन करावे.
- परीक्षेचे नाव: संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT)
- इयत्ता: २री ते ८वी
- परीक्षा: नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात
- परीक्षा कालावधी: दिवाळी सुट्टीनंतर
- संकलित मूल्यमापन चाचणी २: एप्रिल २०२७
- मुख्य विषय: प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी)
- आयोजक: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे